लासलगावात ‘बोगस ताडी’ आणि ‘कुत्ता गोळी’चा धुमाकूळ; तरुणाई विनाशाच्या उंबरठ्यावर
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लासलगाव आणि परिसरात सध्या एका भयानक नशेच्या विळख्याने तरुण पिढीला ग्रासले आहे. केवळ नफा कमवण्याच्या हव्यासापोटी रसायनांचा वापर करून बनवलेली ‘बोगस ताडी’ आणि ‘स्टिंग’ सारख्या एनर्जी ड्रिंकमध्ये औषधी गोळ्या (कुत्ता गोळी) मिसळून केली जाणारी नशा तरुणांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी सामाजिक हानी होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
केमिकलचा जीवघेणा खेळ
मिळालेल्या माहितीनुसार, विक्री केली जाणारी ताडी ही नैसर्गिक नसून ती पूर्णपणे केमिकल युक्त आहे. ही बोगस ताडी प्यायल्याने नागरिकांच्या आरोग्यावर तात्काळ आणि दीर्घकालीन दोन्ही प्रकारचे गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः तरुण युवक शाळकरी मुलामध्ये या नशेचे प्रमाण वाढवून त्यांना मुळासकट उखडण्याचे हे एक ‘हळूहळू पसरणारे विष’ असल्याचे बोलले जात आहे
या नशेमुळे तरुणांचे शरीर आणि मन दोन्ही पोखरले जात आहे:
रासायनिक ताडीच्या अतिसेवनाने अनेक तरुणांचे मानसिक संतुलन बिघडले असून, ते वेडेपणाच्या उंबरठ्यावर आहेत.
कमी वयातच हाडांचे आजार, तीव्र गुडघेदुखी आणि कंबरदुखीने तरुण त्रस्त झाले आहेत.
या विषारी नशेमुळे नपुंसकत्व आणि इतर गंभीर आजार जडत असल्याने अनेक कुटुंबांचे हसे झाले असून, भावी पिढी धोक्यात आली आहे.
स्टिंग’ आणि ‘कुत्ता गोळी’चे नवे संकट
केवळ ताडीच नव्हे, तर ‘स्टिंग’ सारख्या एनर्जी ड्रिंकमध्ये ‘कुत्ता गोळी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंगीकारक गोळ्या मिसळून नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. या नशेच्या अमलाखाली तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत असून, समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे केवळ व्यसन नसून, आपल्या समाजाला नष्ट करण्याचे षडयंत्र आहे. रसायने मिसळून मानवी जीवाशी खेळणाऱ्या या माफियांना वेळीच रोखले पाहिजे. आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही!”
– स्थानिक जागरूक नागरिक
प्रशासनाला इशारा आणि मागणी
लासलगाव परिसरातील या विषारी ताडीचे अड्डे आणि अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांनी या माफियांच्या मुसक्या आवळून कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आपल्या गावातील तरुणांना वाचवण्यासाठी पालकांनी सतर्क राहावे आणि नशा मुक्त समाजासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा!
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





