लासलगाव येथे १२५ महिलांना ‘महिला सन्मान स्मार्ट कार्ड’चे वाटप; सौ. स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते वितरण
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लासलगाव येथे १२५ महिलांना ‘महिला सन्मान स्मार्ट कार्ड’चे वाटप; सौ. स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते वितरण
महेश साळुंके /लासलगाव
“महिला सन्मान स्मार्ट कार्ड योजना ही केवळ एस.टी. प्रवासातील भाड्याची सवलत नसून, ते महिलांच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाचे प्रतीक आहे. अर्ध्या तिकिटात सुरू होणारा हा प्रवास महिलांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे घेऊन जाईल,” असे प्रतिपादन भाजप नाशिक जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस तथा बचत गट प्रमुख सौ. स्मिताताई कुलकर्णी यांनी केले.
लासलगाव येथील ग्रामपंचायत हॉल (अहिल्यादेवी चौक, किल्ल्याजवळ) येथे आयोजित कार्यक्रमात परिसरातील १२५ महिलांना स्मार्ट कार्डचे यशस्वी वितरण करण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
लासलगाव नगरीत पहिली सामूहिक नोंदणी
महिला सन्मान योजनेचा लाभ गावातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचावा यासाठी सौ. स्मिता कुलकर्णी आणि एस.टी. महामंडळाचे अधिकृत नोंदणी प्रमुख मुकेश गायधनी यांच्या विशेष पुढाकारातून लासलगाव नगरीतील पहिली ‘स्मार्ट कार्ड ग्रुप नोंदणी’ अत्यंत यशस्वीरी्या पूर्ण करण्यात आली होती. या मोहिमेत बचत गटातील आणि परिसरातील १२५ महिलांनी नोंदणी केली होती, त्या सर्व कार्डांचे वाटप आज करण्यात आले.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि पात्रता:
पात्रता: वय वर्षे १२ च्या पुढील सर्व मुली आणि महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
सवलत: एस.टी. महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना महिलांना तिकिटाच्या दरात थेट ५०% सूट (अर्धे तिकीट) मिळते.
पारदर्शकता: शासनाच्या योजना फक्त कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात कशा राबवल्या जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
ज्या महिलांनी अद्याप आपले एस.टी. स्मार्ट कार्ड काढले नसेल, त्यांनी ते तातडीने काढून घ्यावे आणि आपला भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित व सुकर करावा.”
—सौ. स्मिता कुलकर्णी, भाजप जिल्हा सरचिटणीस (महिला मोर्चा)*
या कार्यक्रमादरम्यान मुकेश गायधनी यांनी उपस्थित महिलांना स्मार्ट कार्डच्या वापराविषयी माहिती दिली, तसेच शासनाच्या इतरही विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या योजनेमुळे लासलगाव व परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या प्रवासाला आता अधिक गती मिळणार आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





