नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लासलगाव आणि सिन्नर येथे होणार ‘अपर तहसीलदार’ कार्यालय; हरकती व सूचना मागवल्या! – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

लासलगाव आणि सिन्नर येथे होणार ‘अपर तहसीलदार’ कार्यालय; हरकती व सूचना मागवल्या!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

महेश साळुंके /लासलगाव

निफाड उपविभागातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव आणि सिन्नर तालुक्यात अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबतची महत्त्वपूर्ण जाहीर सूचना उपविभागीय अधिकारी कार्यालय, निफाड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी सुधारित माहिती व नकाशे सादर करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार हे नवीन प्रस्ताव जाहीर करण्यात आले आहेत.
प्रस्तावित कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे असेल:

१) अपर तहसीलदार कार्यालय, लासलगाव:
मुख्यालय: लासलगाव
अपर तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळे: लासलगाव, विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर.

तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळे: निफाड, चांदोरी, सायखेडा, रानवड, पालखेड, पिंपळगाव-बसंत, ओझर.
एकूण महसूल मंडळे:११ (तालुका: निफाड, जिल्हा: नाशिक)

२) अपर तहसील  कार्यालय, सिन्नर:
मुख्यालय:सिन्नर

अपर तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळे:सिन्नर, नायगाव, पांगरी, सोनांबे, डुबेर

तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महसूल मंडळे: गोंदे, नांदूरशिंगोटे, वावी, शहा, वडझाळी, पांगरी बु., देवपूर.
एकूण महसूल मंडळे: १२ (तालुका: सिन्नर, जिल्हा: नाशिक)

 

७ जुलैपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी

या नवीन अपर तहसील कार्यालयांच्या निर्मितीबाबत जर कोणाला काही हरकत किंवा सूचना मांडायची असेल, तर ते आपली लेखी हरकत उपविभागीय अधिकारी कार्यालय, निफाड येथे नोंदवू शकतात.
मुदत: २३ जून २०२६ पासून पुढील १५ दिवसांत म्हणजेच ०७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत.
टीप:मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही हरकती किंवा सूचनांचा विचार केला जाणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
या निर्णयामुळे आता स्थानिक नागरिकांना शासकीय कामांसाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही आणि प्रशासकीय कामांना वेग येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now