नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , अखेर गुटखा माफिया निलेश बोथराला लासलगाव पोलिसांनी चांगलेच तुडवले … – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

अखेर गुटखा माफिया निलेश बोथराला लासलगाव पोलिसांनी चांगलेच तुडवले …

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लासलगाव | नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला थेट आव्हान देत पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. तरुणावर अमानुष मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुटखा माफिया निलेश बोथरा याच्यावर लासलगाव पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली कायद्याचा बालेकिल्ला दाखवण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बोथरा सह त्याच्या साथीदाराला चांगलेच तुडवले.शिंदे यांनी गुन्हेगारानां चोख प्रत्युत्तर देत कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्याचाच प्रसाद दिला जाईल असा संदेश दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, विंचूर येथील गणेश साळुंके या तरुणाला क्षुल्लक कारणावरून निलेश बोथरा व सचिन जेऊघाले यांनी अडवून बेदम मारहाण केली. मारहाण इतकी निर्दयी होती की साळुंके गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने गावात संतापाची लाट उसळली होती.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत शिंदे यांनी कठोर पवित्रा घेतला. या निर्णायक भूमिकेमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून कायदा-सुव्यवस्थेचा ठाम धाक निर्माण झाला आहे.
या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस प्रशासनाने विंचूरसह संपूर्ण परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई अटळ आहे, असा स्पष्ट संदेश देत शिंदे यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
एकीकडे गुन्हेगारांची दहशत मोडीत काढणारी कडक कारवाई, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना दिलासा विंचूर प्रकरणातून पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही . दरम्यान या प्रकाराने भाईगिरी करणारांना चाप बसेल असे नागरिकांमध्ये बोललं जातं आहे .

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now