नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , चिमुकलीवरील अत्याचाराच्या विरोधात लासलगावी जन आक्रोश मोर्चा. आरोपीला फाशी देण्याची मागणी – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

चिमुकलीवरील अत्याचाराच्या विरोधात लासलगावी जन आक्रोश मोर्चा. आरोपीला फाशी देण्याची मागणी

filter: 109; fileterIntensity: 1.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 39;

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

चिमुकलीवरील अत्याचाराच्या विरोधात लासलगाव शहरात
जन आक्रोश मोर्चा

आरोपीला फाशी देण्याची मागणी

महेश साळुंके/लासलगाव

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे केवळ चार वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भयावह घटनेचा तीव्र निषेध करत लासलगाव शहरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांनी शनिवारी (दि. २९) मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश मोर्चा काढला. शहरात पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने, व्यापार प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चाला मोठा प्रतिसाद दिला.

आरोपीला फाशीची शिक्षा द्या

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात डोंगराळे येथील ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ लासलगाव शहर स्वयंस्पुर्तीने कडकडीत बंद पाळून लासलगाव पोलीस ठाण्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.सकल लासलगाव नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनावरून व्यापाऱ्यांनी आपले व्यापारी प्रतिष्ठान स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेऊन मोर्चात मोठा सहभाग नोंदवला. येथील एसटी डेपो पासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य रस्त्यावरून जात असताना चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशी द्या, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील अशा घोषणां देण्यात आल्या.

महिला, युवक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना विद्यार्थिनींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

निवेदनात आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा व्हावी, प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे, सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पीडित कुटुंबास शासकीय आर्थिक मदत द्यावी, पोलिस अथवा प्रशासनातील कोणतीही निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, पीडित कुटुंबाचे सर्वांगीण पुनर्वसन करावे या मागण्या करण्यात आल्या.

मोर्चामध्ये शहरातील विविध समाज घटक, सामाजिक संस्था, राजकीय नेते, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

 

मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरासह ग्रामीण भागातील महिला पुरुषांची व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर मोर्चात सामील झाले. या मोर्चातील उपस्थितीमुळे रस्त्यांवर जनसागर उसळल्याचे चित्र दिसत होते.न्याय द्या न्याय द्या, चिमुकलीला न्याय द्या तसेच नराधमाला तात्काळ फाशी द्या,अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. मोर्चेकऱ्यांच्या हातात चिमुकली हत्येच्या निषेधाचे फलक घेण्यात आले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now