अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर; आकांवर संगठीत गुन्हेगारीची मोक्का अंतर्गत कारवाई होणार का?
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
महेश साळुंके
•मटका पिढ्या बंद असल्या तरी डिजिटल फंडा वापरून मोबाईलहुन मटका स्वीकारणं सुरू
•जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे.
पोलिसांनी सुरु केलेल्या या मोहिमेमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
° विंचूरमध्ये मटक्याची कटिंग घेणारा राजकीय वरदहस्त असलेल्या शाडो रतन खत्री वर कारवाई होणार का?
पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुरू असलेला वरली, मटका, जुगारासह गांजा,अवैध दारू विक्री विरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे . विंचूर लासलगाव परिसरात गेल्या काही दिवसांत वरली, मटका आणि जुगारासह गांजा, अवैध धंदे जोरात सुरू करण्यात आले आहेत. यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, या धंद्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सर्व अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने वरली, मटक्यासह अवैध दारूविक्रीच्या ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. तसेच जिल्हा अधीक्षकांनी विशेष पथके स्थापन केली असल्याचे समजते या अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे टाकत मोठी कारवाई करण्यात येत आहे पोलिसांनी सुरु केलेल्या या मोहिमेमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
गेल्या आठ दिवसापासून अवैध धंदेवाले भूमिगत झाले असून त्यांनी कारवाईचा धसका घेतला आहे असे भासत असले तरी
मटका पिढ्या बंद असल्या तरी डिजिटल फंडा वापरून मोबाईलहुन मटका स्वीकारणं सुरू असल्याचे समजते हे एक प्रकारे पोलीस अधीक्षकांना खुलेआम- चैलेंज आहे पोलिसांनी किती जोर लावला तरी सट्टा मटका बंद होणारच नाही अशी खुलेआम चर्चा सुरू आहे
सदर अवैध धंदे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी मोक्का अंतर्गत कारवाई होणार का? अशी चर्चा जनसामान्यात दिसून येत आहे
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





