नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लासलगावच्या अनाथाश्रमात ‘माऊली-तुळसा’चा शुभविवाह संपन्न; संत-महात्म्यांनी दिला शुभाशिर्वाद – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

लासलगावच्या अनाथाश्रमात ‘माऊली-तुळसा’चा शुभविवाह संपन्न; संत-महात्म्यांनी दिला शुभाशिर्वाद

filter: 109; fileterIntensity: 1.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 42;

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

लासलगाव प्रतिनिधी /महेश साळुंके

लासलगांव: (प्रतिनिधी) निष्काम कर्मयोगी सद्‌गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या आणि परमपुज्य स्वामी वासुदेवनंदगिरी (बहुरुपी महाराज) यांच्या आशीर्वादामुळे नियोजित ‘ऋषिपुन्न स्वयंवर सोहळा’ आज, बुधवार, दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३५ वाजता अत्यंत उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
लासलगांव येथील ‘जय जनार्दन स्वामी अनाथ व वृध्दआश्रमा’चे ७० वे अनाथ चिरंजीव ज्ञानेश्वर (माऊली) यांचा शुभविवाह सुरगाणा येथील शेतकरी कन्या चि. सौ. कां. तुळसा (तेजस्वीनी) हिच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला.
भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन:
मिती कार्तिक शु।।१५ शके १९४७ या शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. परमपुज्य स्वामी वासुदेवनंदगिरी (बहुरुपी महाराज) यांच्या पालकत्वाखाली वाढलेल्या माऊलीच्या या विवाहासाठी लासलगांव पंचक्रोशीतील सर्व सज्जन भक्त मंडळ, व्यापारी वर्ग, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी माता-पिता यांनी मोठी गर्दी केली होती.
याप्रसंगी अनेक साधु-संत आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली, त्यांनी नवदाम्पत्यास मनःपूर्वक शुभाशिर्वाद दिले. हा विवाह केवळ एक सोहळा नसून, आश्रमाच्या सामाजिक कार्याची आणि प्रेमकृपेची साक्ष देणारा ठरला.
या मंगलमय सोहळ्यासाठी जय जनार्दन स्वामी अनाथ व वृध्दआश्रम परिवारातील ‘अनाथांची माता’ ह.भ.प.सौ. संगिता दिलीप गुंजाळ आणि आश्रमीय सचिव दिलीप बाबुराव पा. गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे हा पवित्र ‘ऋषिपुन्न स्वयंवर सोहळा’ निर्विघ्नपणे संपन्न झाला, असे त्यांनी यावेळी नम्रपणे सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now