नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप – भरपाईसाठी शासन दरबारी फिरूनही मदत नाही – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप – भरपाईसाठी शासन दरबारी फिरूनही मदत नाही

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप – भरपाईसाठी शासन दरबारी फिरूनही मदत नाही

 

खेडलेझुंगे / प्रतिनिधी : बाबा गिते
निफाड तालुक्यात मे-जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचक्रोशीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रुई, खेडलेझुंगे, कोळगाव, देवगाव, सारोळे थडी, नांदूर मध्यमेश्वर, गाजरवाडी, धारणगाव वीर, धारणगाव खडक, करंजी, ब्राह्मणवाडे, झुंगे बेट, तमासवाडी या गावांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि जिल्हाधिकारी नाशिक यांना लेखी निवेदन देऊन नुकसानभरपाईची मागणी केली होती. शासनाने निर्देश देत पंचनामे पूर्ण केले असले तरीही, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव यांच्या विंचूर उपबाजार समिती येथे शेतकऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांच्या माध्यमातून तहसीलदार निफाड यांना निवेदन सादर केले.

या निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, “मे-जून महिन्यातील अतिवृष्टीदरम्यान आमच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पंचनामे पूर्ण होऊनही शासनाकडून एक पैसाही मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही बाधित शेतकरी आर्थिक संकटात आहोत. शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानभरपाई वितरित करण्याची मागणी केली असून, भरपाई न मिळाल्यास कठोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.”

या निवेदनावर शिवाजी सुराशे, निवृत्ती गारे, गोपीनाथ ठुबे, विजय गिते, धर्मराज घोटेकर, केदार घोटेकर, योगेश घोटेकर, सचिन क्षीरसागर यांसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांची मागणी ठाम “शासनाने तात्काळ नुकसानभरपाई वितरित करून न्याय द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल.”

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now