लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित रन फॉर युनिटी “एकता दौड ” उत्साहात संपन्न
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित रन फॉर युनिटी “एकता दौड ” उत्साहात संपन्न
महेश साळुंके/ लासलगाव
लासलगाव :भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन “एकता दौड ने” साजरा करण्यात आला.
पोलीस शहीद सप्ताह, राष्ट्रीय एकता दिन, लोहपुरुष वल्लभभाई पटेल जयंती या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने” पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी कांतीलाल पाटील, लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीएकता दौड ” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकता दौड ची सुरुवात सकाळी ७.३० वाजता लासलगाव पोलीस स्टेशन येथून होऊन विंचूर रोड येथील स्वामी रिसॉर्ट सांगता करण्यात आली.
या एकता दौड मध्ये विविधसामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.यात डॉक्टर असोसिएशन,स्विमिंग ग्रुप, सायकलिंग ग्रुप,पत्रकार बांधच, ग्रामपंचायत,कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी वर्ग, शासकीय व
निमशासकीय संस्था, शाळा,महाविद्यालये, तसेच सामाजिक व धार्मिक मंडळांचे सदस्य यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या दौडीचा उद्देश नागरिकांमध्ये एकता, बंधुता व देशभक्तीची भावना दृढ करणे हा असून, या कार्यक्रमात
लासलगाव पोलीस ठाण्यातील हद्दीतील नागरिकांनीउत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल लासलगाव पोलिस ठाण्याच्या वतीने आभार व्यक्त करण्यातआले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





