कुटुंबातील स्त्री जर आरोग्याच्या दृष्टीने मानसिक दृष्ट्या जर सुदृढ असेल तर तिचं कुटुंब देखील तितकच सुरक्षित असते कुटुंबाचा पाया म्हणजे स्त्री असते-गीतांजली ढिकले
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शासनातर्फे प्रत्येक अंगणवाडीत पोषक महासप्ताह दिनांक 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर साजरा करण्यात येतो अंगणवाडी ह्या बालकांच्या सुदृढ शारीरिक व बौद्धिक विकासाचा केंद्रबिंदू मानला जातो भविष्यातील सुरक्षित व सुशिक्षित बालक व भावी नागरीक घडवण्याचं काम म्हणजे अंगणवाडी आहे. अंगणवाडी ही केवळ लहान मुलांचा विकासासाठी नसून परिसरामध्ये असणाऱ्या गरोदर माता स्तनदा माता कुपोषित बालक यावर देखील या ठिकाणी कार्य केले जाते शासनाकडून दिनांक 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर सही पोषण देश रोशन सप्ताह राबवला जातो असे प्रतिपादन अंगणवाडी सुपरवायझर गीतांजली ढिकले मॅडम यांनी केले सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या भाजपा नाशिक जिल्हा महामंत्री महिला मोर्चा स्मिता कुलकर्णी होत्या विविध प्रकारचे कडधान्य, पालेभाज्या, डाळी यापासून तयार केलेले पदार्थ याचा आपल्या शरीरासाठी होणारा फायदा याची संपूर्ण सजावटीसह मांडणी करण्यात आलेली होती. सशक्त नारी स्वस्थ परिवार अभियाना अंतर्गत कुटुंबातील स्त्री जर आरोग्याच्या दृष्टीने मानसिक दृष्ट्या जर सुदृढ असेल तर तिचं कुटुंब देखील तितकच सुरक्षित असते कुटुंबाचा पाया म्हणजे स्त्री असते स्त्रीचा आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून देण्यात येणाऱ्या योजना कुटुंबाप्रती असलेली कार्य व स्त्रियांनी स्वतःच्या बाबतीत आरोग्याच्या दृष्टीने घेण्याच्या सुरक्षिततेविषयी स्मिता ताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमांमध्ये भारताचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्य दि 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियान अंतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त महिलांची आरोग्य तपासणी घेण्यात आली आयुष्यमान कार्ड वय वंदन योजना कार्ड नोंदवून कार्ड वाटप करण्यात आले.सदरील कार्यक्रमास अंगणवाडी कार्यकर्त्यां लता जगताप अर्चना चव्हाण अर्चना डुंबरे पद्मा जोशी मीना शेलार अलका होळकर वैशाली शिंदे मदतनीस प्रमिला आहिरे मनीषा त्रिभुवन कविता जगताप कल्पना भावसार मनीषा पवार नंदा हेगडे तसेच आरोग्य खाते गायकवाड सिस्टर महस्के सर आशा वर्कर अर्चना सोनवणे अनिता भागवत आशा शेजवळ व परिसरातील माता-भगिनी उपस्थित होत्या.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





