कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी संकटात; केंद्र सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी सौ. सुवर्णा जगताप
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

लासलगाव – मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत असून, उत्पादन खर्चापेक्षाही कमी भावाने कांदा विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याकरिता लासलगाव बाजार समितीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याची मागणी कृषी मूल्य आयोग तसेच केंद्रीय समितीकडे केली आहे.
या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या सौ. सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली.
आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या धर्तीवर महाराष्ट्रातही कांद्याला थेट सबसिडी देण्यात यावी. कांदा हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असून दिवसेंदिवस त्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. बाजारभावातील चढ-उतार शेतकऱ्यांसाठी संकट निर्माण करतात. त्यामुळे थेट सबसिडीद्वारे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.”
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “देशात उत्पादित होणाऱ्या एकूण कांद्यापैकी 50-60 टक्के कांदा देशांतर्गत वापरला जातो. शिल्लक कांदा निर्यात न झाल्यास तो तसाच साठून राहतो आणि त्याचा परिणाम दरांवर होतो. याशिवाय, नवीन लाल कांदा लवकरच बाजारात येणार असल्याने दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे. यासाठी जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होणे अत्यावश्यक आहे.”
दुसरा मुद्दा,भारतातून अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये कांद्याची निर्यात अत्यल्प होते. या देशांमध्ये कांद्यासाठी ठराविक गुणवत्ता आवश्यक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारावर अवलंबून राहावे लागते आणि भाव घसरणीचा दबाव वाढतो. म्हणूनच या देशांमध्ये निर्यातीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी निर्यातीस योग्य अशा पांढऱ्या व गोड चवीच्या कांद्याची लागवड करावी आणि त्यासाठी लागणारे बीज शेतकऱ्यांना मोफत पुरवावे. यामुळे शेतकरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कांदा उत्पादन करू शकतील आणि भविष्यात निर्यात वाढवून देशाच्या परकीय चलनात भर पडेल. शासनाने या संदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा असे जगताप यांनी नमूद केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





