नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , एनसीएमसी कार्डासाठी ७६ वर्षीय वृद्धेची वणवण; लासलगाव आगारात ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक अन् कर्मचाऱ्यांची अरेरावी! – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

एनसीएमसी कार्डासाठी ७६ वर्षीय वृद्धेची वणवण; लासलगाव आगारात ज्येष्ठ नागरिकांची अडवणूक अन् कर्मचाऱ्यांची अरेरावी!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महेश साळुंके /लासलगाव

डिजिटल इंडिया आणि सुटसुटीत कारभाराचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सवलतीच्या प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ (NCMC) कार्ड बंधनकारक केल्यानंतर, लासलगाव बस आगारातील कारभाराचा फटका शिरवाडे येथील ७६ वर्षीय जनाबाई आवारे या ज्येष्ठ नागरिकाला बसला आहे. तब्बल तीन महिने उलटून आणि कुटुंबाच्या सात ते आठ फेऱ्या होऊनही कार्ड न मिळाल्याने ‘डिजिटल सुविधेचा फायदा नेमका कोणाला?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

३ महिने उलटले, कार्ड गहाळ!

जनाबाई आवारे यांनी १५ मे रोजी लासलगाव आगारातील एनसीएमसी केंद्रावर सर्व कागदपत्रे जमा करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, तीन महिने उलटूनही त्यांच्या हातात कार्ड पडलेले नाही. कार्ड केंद्रातूनच गहाळ झाल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनी आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला. वयोमानामुळे वारंवार येणे शक्य नसल्याने वृद्ध आईसाठी त्यांच्या मुलाने आणि नातवानेही आगारात चकरा मारल्या. मात्र, कार्ड नक्की कुठे अडकले आहे किंवा ते कधी मिळणार, याचे कोणतेही स्पष्ट उत्तर केंद्राकडून देण्यात आले नाही.

ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी आणि उद्धट वर्तन

केवळ कार्डाचा विलंबच नाही, तर या केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबतही नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संयमाने बोलण्याऐवजी केंद्रचालक उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरत असल्याचा अनुभव अनेक वृद्धांना आला आहे. हक्काच्या सुविधेसाठी वयाच्या ७६ व्या वर्षी लासलगाव आगारात हेलपाटे मारावे लागणे आणि वरून अपमानास्पद वागणूक मिळणे, यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आगार प्रमुखांची जबाबदारी झटकणारी भूमिका

या संपूर्ण प्रकाराबाबत आगार प्रमुख प्रशांत गुंड यांच्याकडे विचारणा केली असता, “एनसीएमसी केंद्राशी आमचा थेट संबंध नाही, तुम्ही लेखी तक्रार करा,” असा सल्ला देऊन त्यांनी आपली जबाबदारी तक्रारदारावरच ढकलली. त्यामुळे स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे एसटीच्या ढिसाळ कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून दखल घेऊन संबंधित दोषींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now