खाकी वर्दीतील माणुसकी! लासलगावचे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत निकम यांच्याकडून अनाथ व वृद्धांना शाही भोजन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
खाकी वर्दीतील माणुसकी! लासलगावचे पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत निकम यांच्याकडून अनाथ व वृद्धांना शाही भोजन
महेश साळुंके /लासलगाव
‘पोलीस’ म्हटलं की सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यासमोर कडक शिस्त आणि करारी चेहरा येतो. मात्र, याच खाकी वर्दीच्या मागे एक हळवं आणि सेवाभावी हृदय दडलेले असते, याचा प्रत्यय लासलगाव येथे आला आहे.
लासलगाव पोलीस स्टेशनचे शशिकांत देविदास निकम (दादा) यांनी आपल्या मातोश्रींच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
आईच्या स्मृती प्रित्यर्थ माणुसकीचा वसा
सहसा वाढदिवस किंवा पुण्यस्मरण यांसारख्या कार्यक्रमांवर अनावश्यक खर्च केला जातो. मात्र, निकम दादांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृती जपण्यासाठी एक वेगळी वाट निवडली. त्यांनी जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील सर्व बालकांना आणि वृद्धांना विंचूर येथील शेतकरी हॉटेल’ येथे नेऊन त्यांना मनासारखे आणि शाही भोजन दिले.
शेतकरी हॉटेलमध्ये रंगला आनंदाचा सोहळा
विंचूर येथील हॉटेल शेतकरीचे मालक अनिल दादा दरेकर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आश्रमातील निराधार मुले आणि वृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित सर्वजण भावूक झाले होते. केवळ अन्नदान न करता, स्वतः त्यांच्यासोबत बसून विचारपूस केल्याने अनाथ मुलांना आणि वृद्धांना एक हक्काचा आधार मिळाल्याची भावना निर्माण झाली.
पोलीस खात्यात काम करताना अनेकदा समाजातील दु:ख जवळून पाहता येते. आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देताना समाजातील उपेक्षितांच्या चेहऱ्यावर थोडे जरी हसू आणता आले, तरी आईला खरी श्रद्धांजली मिळेल, असे मला वाटते.”
शशिकांत देविदास निकम (दादा), पोलीस कॉन्स्टेबल, लासलगावसर्वत्र कौतुकाचा वर्षाव
शशिकांत निकम यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘वर्दीतील देवमाणूस’ अशा शब्दांत सोशल मीडियावर आणि लासलगाव परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचे उत्तम उदाहरण निकम दादांनी घालून दिले आहे.
महेश साळुंके प्रतिनिधी, लासलगाव.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





