नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लासलगाव शहरातील विविध मूलभूत समस्या तातडीने सोडवा; लासलगाव शहर विकास समिती आक्रमक! मंत्री छगनराव भुजबळ यांच्यासह संबंधित प्रशासकीय विभागांना विविध मागण्यांचे निवेदन सादर – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

लासलगाव शहरातील विविध मूलभूत समस्या तातडीने सोडवा; लासलगाव शहर विकास समिती आक्रमक! मंत्री छगनराव भुजबळ यांच्यासह संबंधित प्रशासकीय विभागांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महेश साळुंके /संपादकीय 
लासलगाव शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक गंभीर नागरी समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, या मागणीसाठी ‘लासलगाव शहर विकास समिती’ च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. श्री. छगनराव भुजबळ साहेब यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या या निवेदनाद्वारे प्रशासनाला विविध प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.

लासलगाव शहर विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लासलगाव हे महत्त्वाचे शहर असतानाही येथील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. दैनंदिन जीवन, आरोग्य व सुरक्षिततेवर याचा गंभीर परिणाम होत असून स्थानिक प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

समितीने निवेदनाद्वारे मांडलेल्या प्रमुख समस्या व मागण्या:

शेतीमालाची रोख रक्कम: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व अडते व व्यापाऱ्यांकडून शेतीमालाच्या विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ रोख स्वरूपात देण्याचे कडक आदेश देण्यात यावेत.
नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा: शहरात पिण्याच्या पाण्याची अनियमितता कायम असून दररोज नळाला स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी सोडण्याबाबत ठोस व कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी.
•रस्ता, दुभाजक व गटार बांधकाम: मंजूर असलेल्या लासलगाव-पालखेड-पिंपळगाव रस्त्याचे काम करताना, कोटमगाव चौफुली ते सिटी प्राइड मॉल पर्यंत दुतर्फा रस्ता करून मधे दुभाजक (Divider) बसवण्यात यावा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गटारीवर स्लॅब टाकून फूटपाथ करावा व फुटणारी पाण्याची पाईपलाईन गटारीच्या बाहेर हलवावी.
स्ट्रीट लाईटची व्यवस्था: कोटमगाव चौफुली ते नवीन मार्केटपर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकात (Divider) पुरेसे स्ट्रीट लाईट बसवण्यात यावेत.
शिवनदी संवर्धन: मंजूर असलेल्या लासलगावातील शिवनदी संवर्धनाचे काम विनाविलंब तातडीने सुरू करण्यात यावे.
कचरा डेपो समस्या: शास्त्री नगरजवळील कचरा डेपोमुळे स्थानिक रहिवासी व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कित्येक वर्षांपासून प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
निकृष्ट शालेय पोषण आहार चौकशी: गावातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार दिला जात असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी.
रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती: आगामी गणेशोत्सवापूर्वी गावातील प्रमुख मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची तत्काळ डागडुजी करण्यात यावी.
नागरिकांच्या या मूलभूत व न्याय्य गरजांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्रस्त नागरिकांच्या वतीने लासलगाव शहर विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील, अध्यक्ष संदीप उगले, मार्गदर्शक राजेश कराह, बालेश जाधव, उपाध्यक्ष विकास कोल्हे, सल्लागार प्रमोद पाटील, सचिव चंद्रकांत नेटारे व सदस्यांनी दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now