नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नाशिक पोलीस दलातील ‘रियल हीरो’: पो.शि. अमोल तळेकर यांच्या सतर्कतेमुळे सराईत दरोडेखोर गजाआड; ४.५१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत! – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

नाशिक पोलीस दलातील ‘रियल हीरो’: पो.शि. अमोल तळेकर यांच्या सतर्कतेमुळे सराईत दरोडेखोर गजाआड; ४.५१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

महेश साळुंके /संपादकीय 

भल्या पहाटेच्या अंधारात संशयित वाहनाचा पाठलाग करत, स्वतःचा जीव धोक्यात घालून एका सराईत आंतरराज्यीय दरोडेखोराला रंगेहात पकडण्याची धडाकेबाज कामगिरी लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल तळेकर (बॅच क्र. १८३०) यांनी करून दाखवली आहे. तळेकर यांच्या तीक्ष्ण नजरेमुळे आणि तत्परतेमुळे दुकाने व घरे फोडणाऱ्या एका मोठ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश झाला असून, सुमारे ४ लाख ५१ हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी काय घडली घटना?

१८ ऑगस्ट २०२६ रोजी लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विंचूर तीन पाटी येथे पहाटे ३:०० ते ५:०० वाजेच्या सुमारास नाकाबंदी सुरू होती. या नाकाबंदीदरम्यान कर्तव्य बजावत असताना पोलीस अंमलदार अमोल तळेकर यांना विंचूर परिसरात एक संशयित कार (सेंट्रो – क्र. MH 03 AM 3467) अत्यंत संशयास्पद रीतीने फिरताना दिसून आली.

अमोल तळेकर यांनी जराही वेळ न गमावता लागलीच आपल्या गोपनीय माहितीदारांकडून खात्री केली व ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून इतर सहकाऱ्यांना सतर्क केले.

सिनेमॅटिक पाठलाग आणि आरोपीस बेड्या!

अमोल तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयित वाहनाचा शोध सुरू केला असता, सदर कार विंचूर-निफाड रोडने वेगाने पळून जात असल्याचे दिसले. अमोल तळेकर यांनी तात्काळ त्या कारचा थरारक पाठलाग केला व विंचूर एम.आय.डी.सी. वळणावर चालकाला पळून जाण्याचा कोणताही मार्ग न ठेवता कार अडवली.

कारची पाहणी केली असता, त्यामध्ये तांब्याच्या भारी वायर्स आणि चोरीचे साहित्य आढळले. तळेकर यांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपले नाव खुर्शीद अब्दुल हमीद खान (मुळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. इगतपुरी) असे सांगितले. त्याने विंचूर-निफाड रस्तनावरील ‘लोणजाईमाता इलेक्ट्रिकल वर्क्स अँड हार्डवेअर’ या दुकानाचे शटर तोडून ३,५३,२१६ रुपयांच्या तांब्याच्या वायर्स चोरल्याची कबुली दिली.

४.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; १२ हून अधिक गुन्हे उघडकीस!

पोलीस अंमलदार अमोल तळेकर यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलिसांनी आरोपीकडून:

  • ३,५३,२१६/- रु. किमतीच्या चोरीच्या तांब्याच्या वायर्स
  • १,००,०००/- रु. किमतीची सेंट्रो कार (MH 03 AM 3467)
  • लोखंडी बोल्ट कटर आणि पहाड असा एकूण ४,५१,७१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष म्हणजे, पकडलेला आरोपी खुर्शीद खान हा साधासुधा चोर नसून सराईत गुन्हेगार आहे. तळेकर यांच्या सतर्कतेमुळे सायखेडा, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, चांदवड, सटाणा व लासलगाव अशा विविध पोलीस ठाण्यांमधील तब्बल १२ गंभीर गुन्हे (दरोडा, घरफोडी, चोरी) उघडकीस आले आहेत.

वरिष्ठांकडून कौतुक!

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. डॉ. डी.एस. स्वामी सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम. मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. के.के. पाटील सर, अतिरिक्त कार्यभार श्री. संजय बांबळे सर व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सागर कोते सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली.

भल्या पहाटेच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता, धाडसाने दरोडेखोराचा पाठलाग करून त्याला रंगेहात पकडणाऱ्या पोलीस अंमलदार अमोल तळेकर यांच्या या ‘हीरो’सारख्या कामगिरीचे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि पोलीस दलात कौतुक होत आहे. न्यायालयाने आरोपीला २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now