खरीप हंगाम २०२६ : ई-पिक पाहणीसाठी निफाडचे तहसिलदार थेट बांधावर..
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
महेश साळुंके /संपादकीय
खरीप हंगाम २०२६ अंतर्गत ई-पिक पाहणीचे काम प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्याच्या अनुषंगाने निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी मौजे शिरसगाव येथील गट क्रमांक ३५० मधील शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली.

यावेळी संबंधित शेतातील पिकांची सद्यस्थिती, पिकाचा प्रकार तसेच लागवडीखालील क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच ई-पिक पाहणी प्रक्रियेबाबत आवश्यक माहिती घेण्यात आली.
ई-पिक पाहणीद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची अचूक व वस्तुनिष्ठ नोंद करणे आवश्यक आहे. या नोंदीमुळे पिकांची अधिकृत माहिती शासनाच्या अभिलेखात उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच विविध शासकीय योजना, पीकविमा व नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतीसाठी ही नोंद महत्त्वाची ठरते. खरीप हंगाम २०२६ मधील ई-पिक पाहणीचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची प्रत्यक्ष स्थितीनुसार ई-पिक पाहणी करून घ्यावी आणि या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसिलदार नाईकवाडे यांनी केले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





