नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , नाशिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

नाशिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

नाशिक: नाशिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढी मर्यादितची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबई नाका येथील हॉटेल कृष्णलीला येथे पतपेढीचे चेअरमन बाबासाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या वार्षिक सभेसोबतच पतपेढीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा अत्यंत थाटामाटात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि राष्ट्रगीताने झाली. सभेच्या मुख्य कामकाजात पतपेढीचे अध्यक्ष बाबासाहेब खेडकर यांनी मागील वर्षाचा प्रगती अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. त्यानंतर संस्थेचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक वाचून दाखवण्यात येऊन सर्वानुमते मंजूर करण्यात आले. पतपेढीच्या माध्यमातून सभासदांसाठी राबवल्या जाणाऱ्या नवीन कल्याणकारी योजना आणि आगामी वर्षाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा होऊन विविध महत्त्वाचे ठराव एकमताने संमत करण्यात आले.

वार्षिक सभेचे कामकाज अत्यंत खेळीमेळीच्या आणि सुटसुटीत वातावरणात पार पडले. यानंतर झालेल्या गुणगौरव सोहळ्यात विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेल्या गुणवंत पाल्यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच पतपेढीतून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचाही विशेष सत्कार करण्यात आला. गौरव प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत पतपेढीने दिलेल्या या प्रोत्साहनाबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमास पतपेढीचे चेअरमन बाबासाहेब खेडकर, व्हाईस चेअरमन मनोज मोरे यांच्यासह संचालक मंडळातील प्रकाश चव्हाण, उमेश गोपाळनारायण, पंढरीनाथ खैरनार, केदार भदाणे, आसिफ पठाण, विठ्ठल शिंदे, नवीन परदेशी, स्वरूप गोराणे, शिवाजी भोये, सोनाली शिंदे, जनार्दन उशीर, गणेश शिरसाठ, जयप्रकाश सोनवणे, समीर मुळे, गीता कनोज, पुनम घोडे, राकेश बच्छाव, नितीन मेघणे, अच्युत भांगे, एम. व्ही. सोमवंशी तसेच पतपेढीचे सर्व सभासद आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ खैरे यांनी उत्कृष्टपणे केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now