नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लासलगावच्या विकासाचा अनुशेष आणि मतदारसंघाची शोकांतिका: एक वास्तववादी दृष्टीक्षेप – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

लासलगावच्या विकासाचा अनुशेष आणि मतदारसंघाची शोकांतिका: एक वास्तववादी दृष्टीक्षेप

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

संपादक -महेश साळुंके

महेश साळुंके

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून लासलगावची ओळख जगभरात आहे. व्यापारी आणि शेती क्षेत्रात लासलगावने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले असले, तरी राजकीय आणि पायाभूत विकासाच्या बाबतीत मात्र लासलगाववर सातत्याने अन्याय झाला आहे.

लासलगाव येवला मतदारसंघात का गेले?
प्रशासकीयदृष्ट्या लासलगाव हे निफाड तालुक्यात येते. येथील नागरिकांचा दैनंदिन व्यवहार, महसुली कामे, तहसील कार्यालय आणि इतर प्रशासकीय संबंध हे निफाडशी जोडलेले आहेत. येवला तालुक्याशी लासलगावचा थेट व्यावहारिक किंवा प्रशासकीय संबंध येत नाही.
तरीही, २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेदरम्यान (Delimitation)राजकीय आणि लोकसंख्येच्या समीकरणांमुळे लासलगावला निफाड विधानसभा मतदारसंघातून वेगळे करून ‘येवला-लासलगाव’ मतदारसंघात जोडण्यात आले. या पुनर्रचनेत भौगोलिक आणि व्यावहारिक सोयीपेक्षा राजकीय गणितांना जास्त प्राधान्य दिले गेले, ज्याची फळे आज लासलगावची जनता भोगत आहे. निफाड तालुक्यातील हे महत्त्वाचे शहर येवला मतदारसंघाचा भाग बनल्यामुळे लासलगावचा राजकीय दबाव आणि प्रशासकीय पकड दोन्ही कमजोर झाली.
गेल्या १५ वर्षांत लासलगावचा विकास खरंच झाला का?
गेल्या १५ वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व माजी अन्न व नागरी पुरवठामंत्री नामदार छगनराव भुजबळ करत आहेत. महाबलाढ्य नेतृत्व, वजनदार मंत्रीपद आणि मोठा राजकीय अनुभव पाठीशी असूनही येवल्याच्या तुलनेत लासलगावचा विकास मात्र कागदावरच राहिला. येवला शहरामध्ये जसा कायापालट झाला, तशी लासलगावची अवस्था बदलू शकली नाही.

सुमारे २५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले लासलगाव हे ग्रामीण भागातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. एवढी मोठी लोकसंख्या आणि आर्थिक उलाढाल असणाऱ्या या गावाला ‘नगरपंचायत’ होणे अत्यंत अपेक्षित होते. नगरपंचायत झाली असती तर शहराच्या विकासासाठी स्वतंत्र निधी, प्रशासकीय यंत्रणा आणि मूलभूत सुविधांचा विस्तार वेगाने झाला असता. परंतु, गेल्या १५ वर्षांत सत्तेत असणारे वरिष्ठ नेतृत्व नामदार छगनरावजी भुजबळ साहेब लासलगावला एक नगरपंचायतसुद्धा मिळवून देऊ शकले नाहीत, ही इथल्या स्थानिक विकासाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

लासलगावसारख्या मोठ्या शहराला ‘एज्युकेशन हब’ बनवणे अत्यंत गरजेचे होते. परंतु, इथे उच्च शिक्षणासाठी, पदवी व तंत्रशिक्षणासाठी उत्तम दर्जाच्या शासकीय किंवा मोठ्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या नाहीत. परिणामी, लासलगाव आणि आसपासच्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना उच्च शिक्षणासाठी दररोज नाशिक किंवा चांदवड गाठावे लागते.
लासलगाव म्हणजे फक्त कांदा मार्केट! पण केवळ कांदा मार्केट या एकाच घटकावर संपूर्ण परिसरातील हजारो तरुणांना रोजगार मिळणे शक्य नाही. इथे एमआयडीसी किंवा अन्न प्रक्रिया उद्योगांची (Food Processing Industries) उभारणी होणे गरजेचे होते. रोजगाराचे कोणतेही नवीन साधन उपलब्ध नसल्यामुळे येथील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या शोधात दररोज विंचूर एमआयडीसी किंवा नाशिकला अप-डाऊन करावे लागत आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न! आशियात नावाजलेल्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना आज १५-१५ दिवस नळाला पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी जनतेचे हाल होत आहेत.
पाणी प्रश्न मिटवण्यासाठी ‘१६ गाव पाणी योजना’ आणली गेली, मोठ्या बाता मारल्या गेल्या. परंतु, प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे कि ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. १५ वर्षांत सत्तेत असूनही लासलगावचा पाण्याचा मूलभूत प्रश्न सुटू शकला नाही, ही इथल्या नेतृत्वाची मोठी निष्क्रीयता मानली जाते.
लासलगावने संपूर्ण देशाच्या अर्थकारणाला आणि कृषी क्षेत्राला दिशा दिली, परंतु राजकीय अनास्थेमुळे लासलगाव स्वतःच्या हक्काच्या विकासापासून वंचित राहिले.

निफाडशी असलेले प्रशासकीय नाते तोडून येवल्याला जोडणे आणि त्यानंतरही २५ हजार लोकसंख्येच्या या गावाला नगरपंचायतीचा दर्जा न मिळणे, तसेच वजनदार नेतृत्वाकडून लासलगावच्या मूलभूत गरजांकडे -पाणी, शिक्षण आणि रोजगार दुर्लक्ष होणे, ही लासलगावच्या जनतेची मोठी शोकांतिका आहे. आता केवळ कांदा बाजारपेठेची ओळख पुरेशी नाही, तर लासलगावला हक्काचा विकास आणि मूलभूत सुविधा मिळणे ही काळाची गरज बनली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now