नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लासलगाव येथे १९ ऑगस्टला मोफत भव्य आरोग्य तपासणी व आयुर्वेद चिकित्सा शिबिराचे आयोजन – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

लासलगाव येथे १९ ऑगस्टला मोफत भव्य आरोग्य तपासणी व आयुर्वेद चिकित्सा शिबिराचे आयोजन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

महेश साळुंके /लासलगाव
श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित एस.एन.जे.बी आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चांदवड, राका एक्सपोर्ट लासलगांव आणि लायन्स क्लब ऑफ लासलगांव प्राइड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी लासलगाव येथे सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेद चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय संघपती रतनलालजी बन्सीलालजी राका, लासलगांव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर लासलगाव येथील डॉक्टर्स असोसिएशन हॉल, सर्व्हे नं. ९३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. शिबिरामध्ये स्त्रियांचे आजार व पाळीच्या समस्या, श्वसनाचे विकार व दमा, मुळव्याध व भगंदर, त्वचेचे आजार व केसांच्या समस्या, थायरॉईड, मधुमेह, पोटाचे आजार व पचनाच्या समस्या, सांध्याचे विकार यांसारख्या विविध आजारांवर तपासणी केली जाणार असून यामध्ये रक्तातील साखरेची तपासणी देखील केली जाणार आहे.
शिबिराचे उद्घाटन ओमप्रकाशजी राका (माजी चेअरमन व विद्यमान संचालक, दि. लासलगांव मर्चेंट को-ऑप. बँक लि., लासलगांव) यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून लासलगाव येथील नितीन जैन उपस्थित राहणार आहेत. या शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ लासलगांव प्राइडचे अध्यक्ष हेमंत पवार, सचिव ला. दिपक जाधव, खजिनादार अमित गंभीरे तसेच प्रकल्प संयोजक म्हणून नंदाताई डमरे, मंजुषा पाटील, ल प्रियंका गंभीरे, ला. रश्मी माठा आणि ला. वैशाली भावसार कार्य पाहणार आहेत.
या शिबिराचे नाव नोंदणी केंद्र इच्छापूर्ती क्लिनिक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या खाली, नामदेव कॉम्पेक्स, लासलगांव हे असणार आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी डॉ. पूनम प्रदिप गुऱ्हाळे यांच्या ७७९६५६७२७६ किंवा ९४२१६२२८००८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम, जैन गुरूकुल, चांदवड (विश्वस्त मंडळ, प्रबंध समिती व समन्वयक), मेडिकल डायरेक्टर डॉ. दिपाली चंडालिया तसेच डॉक्टर असोसिएशन, लासलगांव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now