नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लासलगाव पोलिसांची कारवाई हजारो रुपयांच्या सुगंधित पान मसाला, गुटखा जप्त – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

लासलगाव पोलिसांची कारवाई हजारो रुपयांच्या सुगंधित पान मसाला, गुटखा जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लासलगाव पोलिसांची कारवाई
हजारो रुपयांच्या सुगंधित पान मसाला, गुटखा जप्त

महेश साळुंके/ लासलगाव

लासलगाव पोलिसांनी lकारवाई करीत ५२ हजार ५९० रुपये किमतीची सुगंधित तंबाखू, सुपारीचा साठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी दुपारी२-४० वाजेच्या सुमारास शहरातील सोहम नगर भागातील एका गाळ्यात रेड करण्यात आली असून, या प्रकरणात एका इसमा विरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सोहन नगर भागातील एका गाळ्यात सुगंधित तंबाखू, सुपारीचा साठा असल्याची माहिती पोकॉ. संदीप डगळे यांना मिळाली होती. या माहितीवरून लासलगाव पोलिसांनी गुरुवारी दुपारी सोहम नगर भागातील गाळ्यावर धाड मारली. मिळाला आला माल-
.९७२०/- रू किंमतीचे डायरेक्टर सुगंधित पान मसाला २७ बॉक्स प्रत्येकी ३६० रुपये छापिव किंमतीचे. १८००० /- रु किंमतीच्या पांढ-या रंगाचे प्लास्टिकच्या ०५ गोण्या त्यामध्ये प्रत्येक गोणी मध्ये गोवा पान मसाला नाव असलेले ३० पाकिट असे एकुण १५० पुडे प्रत्येक पुडीवर १२०रुपये छापिव किंमतीचे.१८३६०/- रू किंमतीचा शॉट ९९९ नाव असलेले तंबाखुचे १०२ पुडे प्रत्येकी १८० रुपये छापिव किंमतीचे ३,६६६/- रू किंमतीचा जी जर्दा नाव असलेले प्रत्येकी १२२ पाकिट प्रत्येकी ३० रुपये छापिव किंमतीचे २८५०/- रू किंमतीचा झेड.एन.०१ जाफरानी जर्दा नाव असलेले ५७ पाकिट प्रत्येकी ५० रुपये छापिव किंमतीचे.एकुण ५२५९०/- प्रकार- वरील तारिख वेळी ठिकाणी आरोपीत मजकुर याने एका पांढऱ्या रंगाच्या गोणी मध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचना क्र. असुमाअ/अधिसुचना /४९६/७ दि.१८/७/२०२३ प्रमाणे महाराष्ट्र राज्य उत्पादन, साठा वितरण व साठयास प्रतिबंधीतअसलेला वरील वर्णनाचा सुगधीत तंबाखु व जर्दा गुटखा या सद्श्य पदार्थाचा साठा किंमत रू.५२५९०/-रु चा मुददेमाल मानवी
शरीरास अपाय कारक व हाणीकारक आहे असे माहीत असतांना सुध्दा स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी साठवणुक करून विक्री
करण्याच्या उद्देशाने ठेवलेला असा एकूण ५२५९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पो कॉ संदीप डगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुकानमालक शैलेश नंदकुमार बागमार रा. लासलगाव ता. निफाड विरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १२३, २२३, २७४, २७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनी भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक साळुंके करीत आहेत

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now