नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , द्राक्ष शेती उद्ध्वस्त; उगावच्या शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या सततचा पाऊस, फळधारणा न झाल्याने नैराश्य; कर्जाच्या ओझ्याने घेतले टोकाचे पाऊल – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

द्राक्ष शेती उद्ध्वस्त; उगावच्या शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या सततचा पाऊस, फळधारणा न झाल्याने नैराश्य; कर्जाच्या ओझ्याने घेतले टोकाचे पाऊल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

बाबा गिते / विशेष प्रतिनिधी

निफा तालुक्यातील उगाव (पानेवडी) येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे (वय ४५) यांनी सोमवारी सकाळी द्राक्ष बागेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे बागेला फळधारणा न झाल्याने ते आर्थिक व मानसिक तणावाखाली होते. सोमवारी (दि.०३) सकाळी सुमारास ८.३० वाजता पानगव्हाणे हे आपल्या द्राक्ष बागेत फेरफटका मारत असताना, वेलींवर फलधारणा झाली नसल्याचे पाहून ते खचून गेले. छाटणी, औषध फवारणी आणि मजुरीवर लाखो रुपये खर्च करूनही उत्पादन मिळाले नसल्याने त्यांनी नैराश्याच्या भरात बागेतच विषारी औषध सेवन केले. त्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटु लागले व ते बेशुध्द पडला. तसेच त्यांच्या तोंडातुन फेसही येवु लागला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी यांनी त्यांना निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत निफाड पोलीस ठाण्यात शुभम पानगव्हाणे यांनी खबर दिली. त्यानुसार पोलीसांनी आकस्मिक मृत्यु म्हणुन नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
यादरम्यान निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी माहीती संकलित करुन अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले.

पानगव्हाणे यांच्या कुटुंबावर कर्जाचे ओझे होते. द्राक्ष हंगाम चांगला जाईल व आपण कर्जमुक्त होऊ, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, बागेची उध्वस्त अवस्था आणि अपयश पाहून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात आहे.

“शासनाने द्राक्षबागांसाठी हेक्टरी ₹३२,५०० इतकी नुकसानभरपाई जाहीर केली असली, तरी परिसरातील शएतकऱ्यांना प्रत्यक्षात केवळ २० टक्केच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना फक्त ₹३,००० ते ₹६,५०० इतकीच मदत मिळालेली आहे. हे प्रमाण अत्यंत अपुरे असून शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीची चेष्टा केल्यासारखे आहे. निसर्गाच्या कोपामुळे या वर्षी फक्त १० टक्केच फळधारणा झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत केलेला उत्पादन खर्चसुद्धा वसूल होणे अशक्य झाले आहे. द्राक्ष उत्पादनासाठी प्रति एकर सुमारे २.५ लाख इतका खर्च येतो. अशा परिस्थितीत शासनाने १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांचे कर्ज तत्काळ माफ करणे गरजेचे आहे. नाहीतर अशाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहतील.– सोमनाथ (आबा) पानगव्हाणे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, उगांव”

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now