नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , येवला मुक्तीभूमीत 13 ऑक्टोबर धर्मांतर वर्धापनदिनी सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – उत्तमराव निरभवणे – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

येवला मुक्तीभूमीत 13 ऑक्टोबर धर्मांतर वर्धापनदिनी सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – उत्तमराव निरभवणे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे घेतलेल्या एका परिषदेत धर्मांतराची घोषणा केलेले ऐतिहासिक स्थळ म्हणजे…. येवल्याची मुक्तीभूमी जिथे त्यांनी “मी हिंदू म्हणून जन्माला आलो. तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ” असे म्हटले होते या ऐतिहासिक घोषणेमुळे या स्थळाला आंबेडकरी चळवळीत ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
आणि या ऐतिहासिक स्थळावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मुक्तीभूमी स्मारक उभारण्यात आले आहे. ज्याला २ एप्रिल २०१४ रोजी लोकांच्या भेटीसाठी खुले करण्यात आले.
आहे त्यामुळे संपूर्ण भारत देशातून आणि विदेशातून येथे दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने गर्दी करतात.येवला मुक्ती भूमीला नागपूरची दीक्षाभूमी आणि दादरची चैत्यभूमी प्रमाणेच महत्त्वपूर्ण मानले जाते. त्याचबरोबर भीमा कोरेगावच्या हुतात्म्यांच्या विजय स्तंभाला अभिवादन करतात तसेच
दरवर्षी येवल्याच्या मुक्ती भूमीवर १३ ऑक्टोबर रोजी धर्मांतर घोषणाचा वर्धापन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या व तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी लीन होण्यासाठी मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने येथे आंबेडकरी अनुयायी येत असतात.यावेळी विविध सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजित केलेले असतात. त्यामुळे नागपूर चैत्यभूमी व भीमा कोरेगाव यांच्या धर्तीवर येवला मुक्ती भूमीसाठी बार्टी संस्थेमार्फत फूड पॅकेट वाटप करणे आवश्यक आहे. सर्वासाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी,तात्पुरती स्वच्छतागृहे,
दुरवरून येणाऱ्या रात्रीच्या वेळी येणाऱ्या अनुयायासाठी झोपण्याची राहण्यासाठी शेडची व्यवस्था , तसेच वैद्यकीय मदत प्राथमिक आरोग्य सेवा आणि गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व प्रशासनाकडून स्वयंसेवक, होमगार्ड यांची तजवीज करण्यात यावी. मोफत वाहतुकीची व्यवस्था मोफत वाहनतळ लाईटची व्यवस्था करण्यात यावी. तसेच या ठिकाणी येणारा मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचा जनसागर असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी बार्टीने घ्यावी.अशी मागणीचे निवेदन नाशिक प्रादेशिक उपायुक्त श्री.वाघ साहेब यांना दिले. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव निरभवणे, प्रदेश पदाधिकारी अँड प्रभाकर वायचळे, संदिप अंभग, पत्रकार मुकुंद आव्हाड, प्रदीप कापसे, राजेद्र दिवेकर, अनिल शिंदे, गणेश राजेंद्र लोखंडे, नाशिक शहराध्यक्ष अमोल लांडगे, यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now