नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +917843010286 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , निफाड पंचायत समितीत गलथान कारभार घरकुल विभागाचा दरवाजाच दिवसभर बंद; गटविकास अधिकारी यांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही – दैनिक कलम गिरी

दैनिक कलम गिरी

Latest Online Breaking News

निफाड पंचायत समितीत गलथान कारभार घरकुल विभागाचा दरवाजाच दिवसभर बंद; गटविकास अधिकारी यांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

लासलगाव – निफाड पंचायत समितीतील प्रशासनाचा कारभार सध्या पूर्णतः गलथान झाला आहे. घरकुल विभाग हे याचे ठळक उदाहरण ठरत असून, विभागाचा दरवाजा अनेकदा दिवसभर बंदच असतो. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी, गटविकास अधिकारी (BDO) मात्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे आरोप आहेत.

घरकुल योजनेतून घर मिळवण्यासाठी अर्जदार अनेक वेळा कार्यालयात चकरा मारतात. मात्र दरवाजा बंद असल्याने त्यांना फक्त अपमानाचाच सामना करावा लागतो. ना कोणी उपस्थित, ना कुठलीही माहिती. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कर्मचारी गायब असतात आणि गटविकास अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.

स्थानिकांनी या गलथान कारभाराची तक्रार वरिष्ठ पातळीवर नेण्याचा इशारा दिला आहे. “शासकीय योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आम्ही दरवाजे झोडपतो आणि अधिकारी मात्र हवेतच असतात,” अशी प्रतिक्रिया एक ज्येष्ठ नागरिकाने दिली.

प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ दखल घ्यावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सध्या ग्रामस्थांमधून होत आहे

घरकुल विभागातील अधिकारी हे सुट्टीवर होते परंतु ऑफिस का बंद होते याची माहिती मी सोमवारी घेते
प्रतिक्रिया:- गटविकास अधिकारी नम्रता जगताप

 

 

 

मी माझ्या कामानिमित्त पंचायत समिती येथे गेलो असता येथील घरकुल विभाग दरवाजा बंद होता ज्येष्ठ नागरिक व काही घरकुल लाभार्थी नोंद करण्यासाठी सकाळपासून पाच वाजेपर्यंत दरवाजा उघडण्याची वाट बघत होते त्यात गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्याही ऑफिस बंद होते त्यानंतर मी सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांना विचारणा केली त्यांनी सांगितले की ते कंत्राटदार म्हणून अधिकारी आहे त्यांनी रजा घेतलेली आहे की नाही हे मला सांगता येणार नाही अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी
प्रतिक्रिया रामदास घायाळ

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now